सर्वसाधारण पाऊसमान, पिकांना भाव मिळणार नाही! भेंडवळची भविष्यवाणी

अखेर शनिवारी प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत 350 वर्षांहून अधिक अशा भेंडवळच्या भविष्यवाणीची परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलढाणा जिह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱयांचे लक्ष लागलेले होते. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असे भाकित वर्तवण्यात आले आहे.

या वर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार.
देशाच्या प्रधानावरही संकट आहे असे भाकित वर्तवण्यात आले आहे.
देशाच्या संरक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे.
देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.
पृथ्वीवर मोठे संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.

आपली प्रतिक्रिया द्या