संघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल – आझाद

1067
chandrashekhar-azad-bhim-ar

आम्ही संविधानाला मानणारे आहोत. संविधान माणसाला जोडण्याचे काम करते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुस्मृतीला मानतो. मनुस्मृतीच्या माध्यमातून या देशात परत एकदा तुकडे पाडण्याचा, संविधानाचा अजेंडा बदलण्याचा संघाचा डाव आहे. परंतु आम्ही हा डाव हाणून पाडू असा इशारा देतांनाच भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आजाद (रावण) यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची मागणी केली. संघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रेशिमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपाला संघच चालवतो. भाजपाच्या माध्यमातून संघ मनुस्मृतीसह आपला अजेंडा चालवित आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे त्याचाच एक भाग आहे. आम्ही हा डाव हाणून पाडू, असे आझाद म्हणाले. 4.05 वाजता व्यासपीठावर येताच आजाद यांनी सर्वप्रथम तिरंगा फडकवला. देशाच्या कानाकोपऱयात तिरंगा फडकवू असे ते म्हणाले. भाषणात त्यांनी संघस्थानावर तिरंगा फडकवा, असे आवाहन संघाला केले.

आपली प्रतिक्रिया द्या