कोरेगाव-भीमाप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे-पाटील यांनी चौकशी आयोगाकडे फडणवीस यांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही आरोप आहेत, पण त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाईची भूमिका फडणवीस यांनी घेतली नाही. उलट आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून त्यांनी या घटनेमागील सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केला आहे. लाखे-पाटील यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणासंदर्भात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेत फडणवीस यांची उलटतपासणी करण्याची मागणी केली आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी घ्यावी. हिंसाचारात भगवे झेंडे फडकविणाऱया अनेक दुचाकीस्वारांचे स्थानिक पोलिसांनी संरक्षण केले. यावर फडणवीस यांनी कोणतही भाष्य केल नाही. त्यांच निवेदन आणि पोलिसांच्या तपासात विसंगती असल्याने फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवणे गरजेचे असल्याचे लाखे-पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.