भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण, रिपोर्ट पॉझिटिव्ह

भारतीय जनता पक्षाचे भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी कपिल पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

याआधी पुण्यात महापौर, उपमहापौर यांच्यासह भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परतले, तर मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईवर घरी उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या