भिवंडीतील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून 10 कोटींचा निधी

485
eknath-shinde

भिवंडी येथील महापालिकेच्या स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून 10 कोटी रुपये देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देखभाल-दुरुस्तीअभावी हे नाट्यगृह गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची बाब लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (2) मनीषा म्हैसकर यांना नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 101 कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिले.

भिवंडीतील नाट्यरसिकांसाठी 25 वर्षांपूर्वी या नाट्यगृहाची उभारणी झाली. 25 वर्षे या नाट्यगृहाने भिवंडीतील रसिकांना मनोरंजनाचे एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले होते. काळाच्या ओघात आता नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च लागणार असून भिवंडी महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे महापालिकेला हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राज्य सरकारकडून 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण अष्टिकर यांच्याशी चर्चा करून शिंदे यांनी नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतली आणि तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर करत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना भिवंडी महापालिकेला 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या