
नगरविकास खात्याच्या अखत्यारित काम करणार्या MMRDAच्या हलगर्जीपणामुळे भिवंडीत भयंकर घटना घडली. नारपोली ते धामणकर नाका यादरम्यान सुरू असलेल्या ठाणे, भिवंडी, मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना एक लोखंडी सळई थेट वरून खाली कोसळली. ही सळई खालून जाणार्या रिक्षावर आदळली आणि रिक्षात बसलेल्या प्रवाशाच्या डोक्यातून आरपार गेली. सोनू अली (20, रा. विठ्ठलनगर) असे या प्रवाशाचे नाव असून त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्याचे प्राण बचावले आहेत. मात्र या घटनेमुळे एमएमआरडीएचा बेदरकार कारभार चव्हाट्यावर आला आहे.