धक्कादायक! आर्थिक संकटामुळे अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

2463

अभिनेता समीर शर्माच्या आत्महत्या केल्याच्या काही तासानंतरच एका अभिनेत्रीने देखील आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अनुपमा पाठक असे त्या अभिनेत्रीचे नाव असून ती भोजपूरी चित्रपट व मालिकांमध्ये काम करते. अनुपमाने तिच्या दहिसर येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली. अनुपमा ही आर्थिक अडचणीत होती त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी तिने फेसबुकवरून लाईव्ह येत तिच्य़ा मनातील रोष व्यक्त केला आहे.

अनुपमाने 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याचे समोर आले असून तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला आहे. आत्महत्येपूर्वी अनुपमाने फेसबुकवर लाईव्ह येत तिच्या मनातील घालमेल व्यक्त केली होती. ‘जर तुम्ही कुणाला तुम्ही आत्महत्या करणार असे सांगतिलात. तर ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असली तरी तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहायला सांगेल. कारण आपण मेल्यानंतर ते कोणत्या अडचणीत फसू नये. तसेच तीच व्यक्ती तुमच्या प्रॉब्लेमची खिल्ली उडवेल. तुमचा अनादर करेल. त्य़ामुळे कुणालाही तुमच्या अडचणींविषयी सांगू नका’, असे तिने फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे. अनुपमाने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहली असून त्यात तिने एका कंपनीत पैसे गुंतवले होते मात्र त्या कंपनीने तिचे पैसे बुडवले होते. त्यामुळे ती आर्थिक संकटात होती. तसेच तिने सुसाईड नोटमधून मनीष झा या व्यक्तीने तिची बाईक घेऊन गेल्याचा आरोप केला आहे.

अनुपमा ही मूळची बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील असून ती मुंबईतील दहिसर येथे राहत होती. अनुपमाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस मनीष झा या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

अभिनेता समीर शर्माची आत्महत्या

हिंदी मालिकांमध्ये काम केलेले समीर शर्मा हे मालाडच्या चिंचोली बंदर येथील एका सोसायटीत सहा महिन्यापासून भाडय़ाने राहत होते. बुधवारी रात्री समीरच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने याची माहिती मालाड पोलिसांना दिली. काही केळात मालाड पोलीस घटनास्थळी पोहचले. समीरने किचन मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी समीरचा मृतदेह शक विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्याने दोन-तीन दिवसा अगोदर आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे

एका महिन्यात पाच आत्महत्या
महिनाभरात पाच कलाकारांनी आत्महत्या केल्याने बॉलिवूड सुन्न झाले आहे. मॅनेजर दिशा सालियन, अभिनेता सुशांत सिंह, क्राइम पेट्रोलची अभिनेत्री प्रेक्षा मेहता यांच्या पाठोपाठ समीर शर्मा व अभिनेत्री अनुपमा पाठक यांनीही आत्महत्या केल्या आहेत. शिवाय टिकटॉकस्टार श्रेया कक्कड हिनेही आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या