अजय देवगणने ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’चा पोस्टर केला शेअर; OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचा नवीन पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजय देवगणने सोमवारी आपल्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर्स पोस्ट केले आहेत. सोबतच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे.

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे कथानक 1971 साली झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. यापूर्वी हिंदुस्थान पाकिस्तान युद्धावर अनेक चित्रपट आले मात्र या चित्रपटात हवाई दलाचं युद्धातील योगदान ही पार्श्वभूमी ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ ला असणार आहे. अजय या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता संजय दत्त ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोना आजारामुळे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नाही. लॉकडाऊन पहात अजय देवगणने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या