भूमी पेडणेकर, विक्की कौशलला कोरोना! ‘रामसेतू’च्या सेटवर 45 जण पॉझिटिव्ह

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर, अभिनेता विक्की कौशल तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. तर अभिनेता अक्षय कुमार उपचारासाठी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात आज दाखल झाला आहे. रविवारीच त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

भूमी पेडणेकर म्हणाली, ‘मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे. माझ्या संपका&त आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी.’ अक्षय कुमार पाठोपाठ रामसेतूच्या सेटवरील 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून मढ आयलॅण्ड येथे या चित्रपटाचा सेट उभारण्याचे काम सुरू होणार होते. त्यातील 100 ज्युनिअर आर्टिस्टची कोरोना चाचणी प्रॉडक्शन हाऊसने केली होती. त्यापैकी 45 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या