…तर गोलंदाजीचीच ‘चमक’ निघून जाईल, भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली चिंता

bhuvneshwar-kumar

कोरोनाचे इफेक्ट खेळांवरही दिसून येणार आहेत. क्रिकेटमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खेळाडूंना चेंडूला चमकवण्यासाठी आपल्या लाळेचा किंवा थुंकीचा उपयोग करता येणार नाही. आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. ‘मला स्वींगवर अवलंबून रहावे लागते. जर चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर बंदी लावण्यात आली, तर हा खेळ फक्त फलंदाजांचाच ठरेल’, असे यावर गोलंदाज भुवनेश्वरकुमार याने म्हटले आहे.

आयसीसीने इतर पर्यायाचा विचार करावा
इंग्लंडमधील वातावरण व खेळपट्टय़ा स्वींग गोलंदाजांना मदत करतात. पण काही षटकांनंतर चेंडू जुना झाल्यानंतर त्याला चकाकी आणण्यासाठी लाळेचा किंवा थुंकीचा वापर करावा लागतो. पण यावरच बंदी आणल्यानंतर माझासारखा गोलंदाज ‘लुळा’होऊन जाईल. आयसीसीने नव्या कृत्रिम पर्यायांचा विचार करायला हवा, असे भुवनेश्वरकुमार पुढे आवर्जून नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या