पर्यावरण रक्षणाचा संदेत देत 8 युवकांची 400 किलोमीटरची सायकलवारी

711

जामखेड तालुक्यातील उच्चशिक्षित आठ युवकांनी जामखेड ते शिवनेरी हे 400 किलोमीटरचे अंतर सायकलने प्रवास करत वीस तासात पार केले. त्यांनी या प्रवासात पर्यावरण संरक्षण आणि समृद्धीचा संदेश दिला आहे. तंदुरुस्तीसाठी सायकल चालवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. डॉ. पांडुरंग सानप, डॉ. महेश घोडके, डॉ. अशोक बांगर, डॉ. प्रविण मिसाळ, समिर शेख, दिलीप पवार, शशिकांत राऊत व भास्कर भोरे या आठ युवकांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी सुरू केलेला सायकल प्रवास त्यांचा छंद बनला आहे. आता ते दरवर्षी एका गडकोटकिल्ल्यांना सायकलने प्रवास करत भेट देत आहेत. त्यांच्या सायकलिंग क्लबमध्ये दिवसेंदिवस सदस्य संख्या वाढत आहे.

धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शारिरीक व मानसीक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम व पोषक आहार अत्यंत गरजेचा आहे. वाढत्या वाहनांच्या वापरामुळे ध्वनी व हवा प्रदूषण वाढते आहे. यावर जास्तीत जास्त सायकलचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी चार वर्षांपूर्वी रोज सकाळी सायकलवर फिरायला जाणे सुरू केले. तो त्यांचा छंद बनला त्यांची प्रेरणा घेऊन 15 युवकांनी सायकलवर फिरणे सुरू केले. यातूनच ते वेगवेगळ्या सायकल व मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊ लागले. डॉ. सानप यांनी गोवा येथे झालेली आर्यन मॅन स्पर्धा वेळेअगोदर पूर्ण करूण किताब पटकावला. या ग्रुपने असे ठरवले आहे की, वर्षातून एक वेळा महाराष्ट्रातील गड कोट किल्ल्यांवर सायकलवर जायचे, यानुसार ते गेल्या वर्षी जामखेडवरून रायगडावर सायकलवर गेले होते. यावर्षी ते जामखेड ते शिवनेरी असा प्रवास सायकलवर केला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. आता शहरात जामखेड साईकलिंग क्लब स्थापन करून यात अनेक डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक सहभागी झाले आहेत. ते वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या