
सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ यावर्षी टीआरपी मिळवण्यास असमर्थ ठरला. यामुळे या शो ला मुदतवाढ मिळत नाहीये. परिणामी या शो चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. हा ग्रँड फिनाले 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
सध्या शोमध्ये टॉप 10 स्पर्धक आहेत. या 10 स्पर्धकांपैकी एक ‘बिग बॉस 18’ चा विजेता होणार आहे. विवियन दसना, करणवीर मेहरा, चुम दरंग, चाहत पांडे, श्रुतिका राज, शिल्पा शिरोडकर, रजत दलाल, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि कशिश कपूर हे स्पर्धक टॉप 10 मध्ये आहेत. आता या 10 स्पर्धकांपैकी कोण सलमान बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.