बिग बॉस 2020 येतोय!

1138

छोटय़ा पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रियॅलिटी शो बिग बॉसचा 14वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शोच्या फॉर्मटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहेत. यंदा शोचे नाव बदलून ‘बिग बॉस 2020’ असे ठेवण्यात आले आहे. शोचा पाहिला प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

लॉकडाउनमुळे नॉर्मल लाइफमध्ये स्पीड ब्रेकर आला आहे. त्यामुळे मी शेती करत आहे. पण आता सीन पलटणार असे सलमान प्रोमोमध्ये बोलताना दिसतोय. यंदाच्या सीजनची थीम जंगल असून घराचे रूपांतर जंगलात केले जाणार अशी चर्चा आहे. शोचा सूत्रसंचालक सलमान खान लॉकडाऊनमुळे आपल्या पनवेलच्या फार्महाऊसवर वेळ घालवतोय. तिथूनच तो वीकेण्डचा डाव होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरात यंदा मुनमुन दत्ता, सुरभि ज्योती, तेजस्की प्रकाश, शुभांगी अत्रे, निया शर्मा, सुगंधा मिश्रा, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्जा, अध्ययन सुमन आदी सेलिब्रेटी स्पर्धक असण्याची शक्यता आहे. अद्याप त्यांच्या नावावर कलर्स वाहिनीने शिक्कामोर्तब केलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या