
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २००५ नंतर असे झालेले नाही. २०२० मध्ये तीन टप्प्यात मतदान झाले होते, तर २०१५ मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले होते.
दोन टप्प्यात मतदान
आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. याच पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. याच पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बैहारमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी १२१ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी १२२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामध्ये सुमारे ३.९२ कोटी पुरुष, ३.५० कोटी महिला आणि १,७२५ ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे. ७.२ लाख अपंग मतदार आणि ८५ वर्षांवरील ४.०४ लाख ज्येष्ठ नागरिक मतदार यादीत आहेत. यामध्ये १०० वर्षांवरील १४,००० मतदारांचा समावेश आहे.
बिहारमधील निवडणुका पूर्ण पारदर्शकतेने होतील – ज्ञानेश कुमार
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, “बिहारमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्ष, पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेटलो. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. यावेळी बिहार निवडणुका मतदारांसाठी सोप्या पद्धतीने पार पडतील. मतदारांना मदत करण्यासाठी संपूर्ण लॉबी उपलब्ध असेल. बिहार निवडणुका पूर्ण पारदर्शकतेने पार पाडल्या जातील. यावेळी बिहार निवडणुका आतापर्यंतच्या सर्वोत्तम निवडणुकांपैकी एक असतील. हा आयोगाचा हेतू आहे.”