
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीच्या मोठ्या पराभवावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमध्ये काँग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीचा पराभव एसआयआरमुळे झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. बिहारमध्ये एसआयआरने गेम केला आहे आणि आता हाच डाव पश्चिम बंगाल, यूपीसह इतर राज्यांमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही, असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला आहे.
बिहार में जो खेल SIR ने किया है वो प. बंगाल, तमिलनाडू, यूपी और बाक़ी जगह पर अब नहीं हो पायेगा क्योंकि इस चुनावी साज़िश का अब भंडाफोड़ हो चुका है। अब आगे हम ये खेल, इनको नहीं खेलने देंगे।CCTV की तरह हमारा ‘PPTV’ मतलब ‘पीडीए प्रहरी’ चौकन्ना रहकर भाजपाई मंसूबों को नाकाम करेगा।…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 14, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत भाजप प्रणित एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे तर, काँग्रेस प्रणित महाआघाडी मोठ्या फरकाने पिछाडीवर आहे. महाआघाडी ५० हून कमी जागांवर पुढे आहे. निवडणुकीचा निकाल येत असताना अखिलेश यादव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे.
Bihar Election Result 2025 – लालटेन शाम को जलता है… निकालावर तेजस्वी यादव यांची सूचक पोस्ट
बिहारमध्ये एसआयआरने जो गेम केला आहे आणि ते पश्चिम बंगाल, तामिळनाडू, यूपी आणि इतर राज्यात आम्ही होऊ देणार नाही. कारण आता या निवडणूक कटाचा भंडाफोड झाला आहे. आता पुन्हा हा खेळ होऊ देणार नाही. सीसीटीव्ही प्रमाणे आमचा पीपीटीव्ही म्हणजेच पीडीए प्रहरी सतर्क राहून भाजपचे मनसुबे उधळून लावेल, असे अखिलेश यादव म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनीही महाआघाडीच्या पराभवाला एसआयआर जबाबदार असल्याचे म्हटले आहे.


























































