बिहार निवडणूक प्रचारातून परतली अमिषा पटेल; म्हणाली,’माझ्यावर बलात्कार झाला असता’

बिहारमध्ये सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अनेक बॉलीवूड कलाकार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्री अमिषा पटेल बिहारमधील औरंगाबाद येथील लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) उमेदवार डॉ. प्रकाश चंद्र यांचा प्रचार करून मुंबईत परतली आहे. प्रचारादरम्यान आपला अनुभव अत्यंत वाईट असल्याचे ती म्हणाली आहे.

अमिषाने प्रकाश चंद्र यांनी आपल्याला बळजबरीने प्रचार करायला सांगत गर्दीत पठावल्याचा आरोप केला आहे. ती म्हणाली की, यादरम्यान माझ्यावर बलात्कार देखील होऊ शकला असता.

धमकी देऊन बळजबरीने प्रचार करण्यास सांगितलं – अमिषा

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार अमिषा पटेल म्हणाला की, डॉ. प्रकाश चंद्रा यांनी तिला बळजबरीने निवडणूक प्रचार करण्यासाठी ब्लॅकमेल केलं. आपल्याला सांगण्यात आलं होत की, पाटणा जवळ निवडणूक प्रचार करायचा आहे. मात्र मला पाटण्यापासून खूप दूर ओबरा येथे नेण्यात आले. अमिषा म्हणाली की, मला सायंकाळी विमानाने मुंबईला परतायचे होते. मात्र एलजेपीच्या उमेदवारानी मला गावात एकटे सोडण्याची धमकी देत प्रचार करायला लावला.

डॉ. चंद्रा ब्लॅकमेलर आणि वाईट माणूस आहे – अमिषा

अमीषा पटेलने डॉ. चंद्राला लबाड आणि ब्लॅकमेलर व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की, जी व्यक्ती निवडणूक जिंकण्यापूर्वी आपल्यासारख्या महिलेशी असं गैरवर्तन करू शकते, ती व्यक्ती निवडणूक जिंकल्यानंतर तो जनतेशी कसे वागेल?

आपली प्रतिक्रिया द्या