बिहार निवडणुकीत भडकावू वक्तव्ये नकोत!

474

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भडकावू वक्तव्यांवरून निवडणूक आयोगाने भाजप नेत्यांना फटकारल्यानंतर बिहार निवडणुकीत स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित करा आणि भडकावू वक्तव्ये करू नका, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि लोजपा नेते रामविलास पासवान यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला.

दिल्लीतील निवडणुकीत आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या लोजपाचे प्रमुख पासवान यांनी दिलेल्या या सल्ल्याला म्हणून महत्त्व आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत असून त्यात लोजपा आणि राजद पक्षांची आघाडी आहे. आपली आघाडी राज्यात दोन तृतीयांश बहुमताने सरकार बनवेल याबाबत पासवान यांना विश्वास आहे. जी जनावरे योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, तीच रस्त्यांवर मरतात, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या