Bihar election : नितीशकुमार पुन्हा जिंकले तर तो बिहारचा पराभव, चिराग पासवान यांची जनतेला साद

chirag-paswan-ljp-bihar

चूकनही सध्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा या निवडणुकीत जिंकले तर आपल्या राज्याचा पराभव होईल, असा जबरदस्त हल्लाबोल करत लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जनतेला साद घातली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशात आता आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

एनडीएतून बाहेर न पडता एकट्या जेडीयूच्या विरोधात लोजपने जोरदार आव्हान निर्माण करण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्यास आपला पाठिंबा कायम असल्याचे देखील त्यांनी आधी देखील स्पष्ट केले आहे.

चिराग म्हणाले की, आपले राज्य हे मागासलेले आहे. पुन्हा एकदा नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाल्यास आपल्या राज्याचे मोठे नुसान होईल. राज्य संपण्याच्या मार्गावर असेल असे चिराग पासवान म्हणाले.

बिहारमध्ये लोजप हा आता एनडीएचा घटकपक्ष नसाल तरी भाजपला आपला पाठिंबा असल्याचे चिराग यांनी स्पष्ट केले आहे. आपली लढाई नितीश कुमारांशीच आहे, असे त्याने जाहीर करू चाकले आहे. यामुळे नितीश कुमारांच्या जेडीयूसमोर मात्र मत विभाजनाचे तसेच मतविभाजनातून जेडीयू उमेदवाऱ्याच्या पराभवाचे संकट ओढावले आहे.

चिराग पासवान आणि त्यांचा पक्ष कोणत्याही प्रकारे एनडीएचा भाग नाही आणि काही निकाल लागला तरी भाजपला पाठिंबा देण्यावर लोजप ठाम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या