
दिल्ली-हावडा मुख्य रेल्वे मार्गावरी शनिवारी (27 डिसेंबर 2025) सिमेंटने भरलेल्या मालगाडीचा मोठा अपघात झाला आहे. सिमेंटची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मालगाडीचे 12 डब्बे रुळावून घसरले आणि यातले तीन डब्बे थेट नदीत पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान घडली आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वे मार्गाच्या आसनसोल रेल्वे विभागातील जमुई जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त मालगाडी जसीडीह ते झाझा या मार्गावर धावत होती. संपूर्ण मालगाडीत सिमेंटचा माल भरला होता. रात्री 11.30 च्या दरम्यान मालगाडी दिल्ली-हावडा मार्गावरील पूल क्रमांक 676 वर आली असता मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले आणि मोठा अपघात झाला. अपघातामुळे मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरले काही नदीत पडले आणि सिमेंटचा साठा रुळावर पडला. त्यामुळे जसीडीह-झाझा विभागाच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या बचाव कार्य सुरू आहे.
बिहार के जमुई में सीमेंट लदी मालगाड़ी डिरेल हुई। कुल 15 डिब्बे पटरी से उतरे, इसमें 5 डिब्बे नदी में जा गिरे। पटना–हावड़ा ट्रैक पिछले 10 घंटे से प्रभावित है। pic.twitter.com/4b6imfXH6K
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 28, 2025


























































