कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू

कंटेनरचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी कुंजीरवाडी परिसरात घडला आहे. राजू महादेव लंगुटे (वय 28, रा. पिराचा मळा, उरळीकांचन ) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन मोगल (वय 32, रा. पिराचा मळा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नितीन यांचा मावसभाऊ राजू लंगुटे बुधवारी उरळी कांचन परिसरातून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भरधाव कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात राजू गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.