बाईकस्वार होणार मतदार मित्र

302

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदार हे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ‘बाईकस्वार मतदार मित्र’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. वांद्रे विभागात हे बाईकस्वार ठिकठिकाणी फिरणार असून उद्या मतदारांनी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

अनेक मतदारांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर, कोणत्या बुथवर आहे याची माहिती नसते. 500 मिटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या बुथवर मतदारयादीत आपले नाव कुठे आहे याची माहिती मतदार घेत असतात. अशा मतदारांच्या मदतीसाठी हे बाईकस्वार मतदारमित्र पोहोचणार आहेत. मतदान कोणत्या केंद्रावर, कोणत्या बुथवर आहे हे शोधण्यासाठी या बाईकस्वारांकडे टॅब देण्यात आले असल्याचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी सांगितले. 12 बाईकस्वार वांद्रे पश्चिम मतदारसंघात फिरणार आहेत. मतदार मित्र व मतदान तुमचा अधिकार असा संदेश असलेले पांढरे टीशर्ट घालून ते फिरणार आहेत, असे जनावळे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या