बिल गेट्स ‘टॉप 10’ मधून बाहेर, जेफ बेजोस यांनाही झटका; ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अब्जावधीमध्ये उलथापालथ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर वेगवेगळा टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर याचा अनेकांना फटका बसला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जगातील अब्जावधी असलेल्या लोकांमध्येही उलथापालथ पाहायला मिळाली आहे. जगातील टॉप श्रीमंतांच्या संपत्तीत चढ-उतार झाले असून अनेकांना जोरदार झटका बसला आहे. सर्वात जास्त नुकसान अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना बसला असून त्यांना अवघ्या एका दिवसात 17.2 अब्ज डॉलर म्हणजेच 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर बिल गेट्स टॉप 10 यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. जेफ बेजोस हे या यादीमध्ये 237 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे, तर 295 बिलियन डॉलरच्या संपत्तीसोबत ओरेकलचे अध्यक्ष लॅरी एलिसन हे दुसऱया स्थानावर आहेत. टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांना 35 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता त्यांची संपत्ती 352 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. ब्लूमबर्गच्या या यादीत 10 व्या नंबरवर वॉरेन बफे आहेत. त्यांना अवघ्या 24 तासांत 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

– बिल गेट्स यांना जोरदार झटका बसला असून त्यांना 9 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांची संपत्ती आता 122 डॉलर इतकी राहिली आहे. ते आता 12 व्या नंबरवर घसरले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांना 2 हजार कोटींचा फायदा झाला असून ते 17 व्या नंबरवर आहेत.