लालू प्रसाद यांच्यावर येणार बायोपिक, नाव आहे…

974

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले लालू प्रसाद यांच्यावर बायोपिक येणार आहे. भोजपुरी अभिनेता यश कुमार हे लालूंची भुमिका वठवणार आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या आयुष्यावर आधारित राजकीय चरित्रपटाची निर्मिती होणार आहे. लालटेन असे चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटात लालू यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक पैलू उलगडले जातील. फेब्रुवारीत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. स्मृती सिन्हा या लालूंच्या पत्नी राबडी देवी यांची भुमिका करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बिहार आणि गुजरातमध्ये होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या