वो जो था एक मसीहा, मौलाना आझाद यांच्या जीवनावरील चित्रपटाचे प्रदर्शन

39

सामना प्रतिनिधी । मुंबई

मौलाना आझाद यांच्या जीवनावरील पहिला व्यावसायिक चित्रपट येत्या 18 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ‘वो जो था एक मसीहा’ असे चित्रपटाचे नाव असून राजेंद्र फिल्मच्या भारती व्यास यांची प्रस्तुती आहे. मौलाना आझाद यांच्या प्रमुख भूमिकेत लीनेश फणसे आहेत. याशिवाय सिराली (झुलेखा बेगम), सुधीर जोगळेकर, आरती गुप्ते,  डॉ राजेंद्र संजय, अरविंद वेकारीया, शरद शहा, केटी मेंघानी, चेतन ठक्कर, सुनील बळवंत, माही सिंग, चांद अन्सारी आणि वीरेंद्र मिश्रा हे कलाकार चमकणार आहेत.

मौलाना आझाद यांचे नाव अब्दुल कलाम मोहीद्दीन अहमद होते. त्यांचे बालपण हे कोलकाता येथे गेले. त्यांचे मोठे बंधू यासीन आणि तीन मोठ्या बहिणी झैनाब, फातिमा आणि हनिफा यांच्याबरोबर ते राहत असत. त्यांना साहित्यामध्ये रुची होती आणि ‘नारंग-ए-आलम’ हे हस्तलिखित ते प्रकाशित करत असत. त्याला साहित्यिक विश्वात खूप मान्यता मिळाली होती. देशभक्त म्हणून त्यांनी अरबिंदो घोष यांच्या क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय सदस्यत्व स्कीकारले होते. त्यानंतर पत्रकार म्हणून त्यांनी ‘अल हिलाल’ आणि ‘अल बलाह’ ही दोन मासिके चालविली आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ती एकढी लोकप्रिय झाली की भीतीपोटी ब्रिटिश सरकारने ती दोन्ही प्रकाशने बंद केली आणि मौलाना आझाद यांना कलकत्ता येथून हद्दपार केले. त्यांना रांची येथे नजरबंद करून ठेवण्यात आले. देशाच्या स्कातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास सहन केला. 1923मध्ये वयाच्या 35व्या वर्षी ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वतंत्र हिंदुस्थानाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय दाखल केले. संपूर्ण आयुष्य हिंदू-मुस्लिमांच्या एकजुटीसाठी वेचले.

आपली प्रतिक्रिया द्या