रानु मंडलवर येणार बायोपिक, या अभिनेत्रीला मिळाली रोलची ऑफर

1162

एका गाण्यामुळे रातोरात झालेल्या स्टार गायिका रानु मंडलच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीचीही निवड झाली आहे.

रानु मंडल यांनी लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा है हे गाणे गायले होते. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली आणि त्या स्टार झाल्या. आता त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनत आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर साऊथ स्टार सुदीपा चक्रवर्ती यांना रानु मंडलचा रोल ऑफर झाला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलतना सुदीपा यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. परंतु या चित्रपटाची स्क्रिप्ट अद्याप आपल्याला मिळाली नाही. स्क्रिप्ट वाचल्यानंतरच आपला निर्णय कळवू अशी प्रतिक्रिया सुदीपा यांनी दिली आहे.

दिग्दर्शक ऋषिकेश मंडल यांनी चित्रपटाचे नाव प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल असे ठेवले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पश्चिम बंगालमध्ये आणि मुंबईत केले जाईल अशी माहिती ऋषिकेश यांनी दिली.

या चित्रपटात रानु मंडल यांनी गेस्ट ऍपीरेन्स द्यावा अशी दिग्दर्शकाची इच्छा आहे. परंतु यावर अजून काही माहिती मिळाली नाही. चित्रपटाचे शुटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या