
आयपीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या बिरदेव डोणेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू व युवा उद्योजक शिखर पहाडिया यांच्याकडून एक हजार पुस्तके भेट म्हणून मिळाली आहेत. सत्कार करण्यासाठी भेटायला येणाऱ्यांनी ‘बुके नको, बुक द्या’ असे आवाहन बिरदेव डोणेने एका सत्कारप्रसंगी केले होते. या आवाहनाला शिखर पहाडिया यांनी प्रतिसाद देत यूपीएससीसाठी लागणारी एक हजार पुस्तके भेट म्हणून डोणेच्या गावी पाठवली आहेत. मेंढपाळाचा मुलगा अशी ओळख असलेल्या बिरदेव डोणेने संघर्षातून यूपीएससीत यश मिळवले आहे. त्याचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय खडतर वाट असताना त्याने आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले.