Birthday Special – कारकिर्दीच्या शिखरावर असताना मुलीचे ‘ते’ शब्द ऐकून अभिनेत्रीने बॉलिवूडला केला रामराम

5041

जया भादुरी ते जया बच्चन… एक उत्कृष्ट अभिनेत्री ते एक दमदार राजकीय नेतृत्व… बॉलिवूडच्या सुपरस्टारची पत्नी ते खासदार… जया बच्चन. जया बच्चन यांचा आज 73 वा वाढदिवस. सत्यजित रे आणि ऋषिकेश मुखर्जी सारख्या गुणवंत निर्मात्यांसोबत काम केलेल्या जया बच्चन या पडद्यावर आणि राजकीय जीवनातही यशस्वी राहिल्या. चित्रपटात सक्रिय असताना त्यांनी 9 वेळा फिल्म फेअर पुरस्कार पटकावला, यात 3 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि 3 वेळा सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराचा समावेश आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील काही खास किस्से जाणून घेऊया…

जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे झाला. त्यांचे वडील तरुणकुमार भादुरी प्रख्यात लेखक आणि कवी होते. जया बच्चन यांचे प्राथमिक शिक्षण भोपाळ येथील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमध्ये झाले. वडील लेखक असल्याने घरात कलेचे वातावरण कायम असायचे.

screenshot_2020-04-09-16-09-38-179_com-miui-gallery_copy_700x450

वडील तरुणकुमार एकदा जया यांना चित्रपटाची शूटिंग पाहायला घेऊन गेले. तिथे जया यांची त्या काळच्या टॉपच्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांची भेट झाली. याच दरम्यान सत्यजित रे हे आपल्या आगामी चित्रपटासाठी एका अभिनेत्रीचा शोध घेत होते. शर्मिला टागोर यांनी जया यांचे नाव सुचवले. सत्यजीत रे यांच्या फिल्म ‘महानगर’मध्ये जया यांनी भूमिका केली आणि तिथून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

‘महानगर’ या चित्रपटानंतर त्यांनी कलेचे अभिजात शिक्षण घेण्यासाठी एफटीआयआयला जाण्याचा निर्णय घेतला. येथे त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर सुवर्णपदक जिंकले. याच वेळी महान निर्माता-दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी एफटीआयआयला आले आणि त्यांनी जया यांना आपल्या आगामी ‘गुड्डी’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना घेण्यात येणार होते, मात्र मुखर्जी यांना ते योग्य वाटले नाही. यावेळी अमिताभ ‘आनंद’ हा चित्रपट करत होते.

screenshot_2020-04-09-16-09-28-121_com-miui-gallery_copy_700x450

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा एक किस्सा प्रसिध्द आहे. जया बच्चन एफटीआयमध्ये शिकत असताना ऋषिकेश मुखर्जी आणि अमिताभ बच्चन येथे आले होते. तिथे जया यांनी अमिताभ यांना पहिल्यांदा पाहिले. त्यावेळी जया यांच्या मैत्रिणींनी या तरुणात काहीतरी खास आहे असे म्हटले. काही लोक बोलतात दोघे इथेच एकमेकांच्या प्रेमात पडले.

1973 ला अनेक चित्रपट आपटल्यामुळे अमिताभ यांच्यासोबत काम करण्यास अभिनेत्री नकार देत होत्या. तेव्हा जया यांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्धार केला आणि ‘जंजीर’ चित्रपटाला होकार कळवला. हा चित्रपट हिट झाल्यास विदेशात फिरायला जायचा दोघांनी प्लॅन केला. चित्रपट तर सुपरहिट झाला मात्र घरच्यांनी आधी लग्न करा आणि मग फिरायला जा असा तगादा लावला. त्यामुळे दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

screenshot_2020-04-09-16-09-20-259_com-miui-gallery_copy_700x450

सुपरहिट ‘शोले’ या चित्रपटादरम्यान जया बच्चन गर्भवती होत्या. श्वेता बच्चन त्यावेळी पोटात होती. या नंतर अभिषेक बच्चन याचा जन्म झाला. त्यावेळी जया बच्चन ‘सिलसिला’ चित्रपटात काम करत होत्या. तेव्हा मोठी मुलगी श्वेता हिने ‘तू आमच्यासोबत का रहात नाही? काम फक्त बाबांना करू दे’, असा तगादा लावला. यामुळे त्यांचे मन विचलित झाले आणि त्यांनी बॉलिवूडला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर 1998 ला आलेल्या ‘हजार चौरासी की मां’ या चित्रपटात त्या दिसल्या. त्यानंतर ‘फिजा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘लागा चुनरी में दाग’ चितपटातही काम केले. हळूहळू त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि समाजवादी पक्षाच्या त्या सदस्य बनल्या व खासदारही झाल्या.

screenshot_2020-04-09-16-09-51-971_com-miui-gallery_copy_700x450

आपली प्रतिक्रिया द्या