उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, देशभरातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्यतिरिक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, नेते जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.