
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशातील भाजपचे 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केला आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 2 हजार उमेदवार काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये भाजपचे 30 आमदार आहेत असेही कमलनाथ यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
I didn’t say this. I only said that 30 MLAs (BJP) are in contact with me. I can’t talk about why they are in contact with me: Madhya Pradesh Congress chief Kamal Nath on his earlier statement in Indore that 30 BJP MLAs have applied for Congress tickets in upcoming assembly polls pic.twitter.com/fgl7sYShR8
— ANI (@ANI) September 16, 2018
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर हे काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कलमनाथ यांच्यासोबत होते. त्यावरुन पत्रकारांनी गौर यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देणार का या प्रश्नावर गौर यांनाच काय तर मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देतो असेही कमलनाथ म्हणाले. येत्या डिसेंबरमध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये यावेळी सत्तेसाठी जोरदार संघर्ष आहे.

























































