सनी देओलचा सकाळी भाजपमध्ये प्रवेश, संध्याकाळी तिकीट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल याने सकाळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. संध्याकाळी पक्षाने त्याला निवडणुकीचे तिकीटही दिले आहे. भाजपने आपली एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सनी देओअला पंजाबच्या गुरुदासपूरमधून तिकिट जाहीर केली आहे.

काही दिवसांपूर्वी सनी देओलने भाजपध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सनीने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला. भाजपने आज आपली उमेदवारांची 26 वी यादी जाहीर केली आहे. त्यात सनी देओला पंजाबमधून गुरूदासपूरमधून तिकीट देण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री किरण खेर यांना पुन्हा चंदीगढमधून तिकीत देण्यात आली आहे. तसेच होशियारपूरमधून सोम प्रकाश यांना तिकीट देण्यात आली आहे.