
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार सगळचं विकायला निघालंय, आता गोव्यातील दोबोलीम विमानतळ विकण्याच्या तयारीत आहे, असे म्हणत संजय सिंह यांनी निर्णयाला विरोध केला आहे.
VIDEO | Delhi: AAP MP Sanjay Singh claims, “BJP government wants to sell every part of the country and bring its close associates into every sector, even if that leads to increase in unemployment and affects people’s livelihoods. A similar situation is now being seen in Goa. The… pic.twitter.com/vDMlMJao4F
— Press Trust of India (@PTI_News) February 12, 2026
भाजप सरकारला देशाचा प्रत्येक भाग विकायचा आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या मित्रांना आणायचं आहे, यामुळे बेरोजगारी वाढली तर वाढू दे, लोकांचा रोजगार गेला तर जावू दे, हेच काम आता गोव्यात होणार आहे. भाजप सरकार गोव्यातील दाबोलीम विमानतळ विकण्याच्या तयारीत आहे. या विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या दक्षिण गोव्यातील नागरिकांचा विमानतळामुळे रोजगार चालत होता, हॉटेल चालत होते, टॅक्सी चालत होत्या ते आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच आमच्या पक्षाचा आणि आमचा या निर्णयाला विरोध आहे. विमानतळ विकण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रत्येक स्तरावर आम्ही कडाडून विरोध करू, असे संजय सिंह म्हणाले.


























































