भाजपला झटका, वरिष्ठ महिला नेत्याने ठोकला पक्षाला रामराम

60

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या व सामाजिक विकास खात्याच्या प्रमुख पद्मा शुक्ला यांनी पक्षावर आरोप करत पक्षाला राम राम ठोकला आहे. भाजपमध्ये चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप करत शुक्ला यांनी राजीनामा दिला आहे.  भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशमध्ये या वर्ष अखेरीस निवडणुका होणार आहेत त्या आधीच पक्षातील एका मोठ्या नेत्याने राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

पद्मा शुक्ला यांनी त्यांचा राजीनामा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी राकेश सिंह यांना पाठविलेले पत्र समोर आले असून त्यात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘२०१४ च्या पोट निवडणुकीत मी काही मतांनी हरले त्यामुळे पक्षातील नेत्यांनी माझी उपेक्षा केली, तसेच मला चुकीच्या प्रकारची वागणूक दिली त्यामुळे त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.’ असे पद्म शुक्ला यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या