हिरानंदानी बिल्डर्सकडे खंडणी मागणाऱ्या भाजप नेत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाणे पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या भाजपमध्ये असलेले सुधीर बर्गे यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. हिरानंदानी बिल्डरकडे बर्गे यांनी खंडणी मागितली होती. खंडणीसाठी धमकी दिल्याबद्दल बर्गेंना अटक करण्यात आली आहे. २००७ साली ठाण्याच्या बर्गे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकमान्य नगर येथून निवडून आले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.