रायगड जिल्ह्यात भाजप आणि मिंधे गटाचे पदाधिकारी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप करत असल्याने महायुतीमध्ये धुसफूस वाढली आहे. मिंधे गटाचे पदाधिकारी विकासकामे न करताच खोटी बिले काढून घपला करण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
मिंधे गटाचे पदाधिकारी राजा केणी यांनी दिलीप भोईर यांचा ‘माकडचाळे’ करणारे भाजपचे उपजिल्हाध्यक्ष असा पाणउतारा केला होता. या टीकेला उत्तर देताना दिलीप भोईर यांनी विकासकामांची खोटी बिले काढणे हाच एकमेव उद्योग राजा केणी यांचा असल्याचा आरोप केला.