भाजप नेत्यांनी तोंडाला आवर घालावा; संघाचा सल्ला

1598

प्रभू श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम होते. ते वचनमर्यादा पाळायचे. ही वचनमर्यादा लक्षात ठेवून भाजप नेत्यांनी तोंड सोडून बोलू नये, त्यांनी तोंडाला आवर घालावा असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात तीन दिवसांचा ‘अयोध्या पर्व’ हा कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमाच्या आजच्या शेवटच्या दिवशी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी दत्तात्रेय होसबोले यांनी भाजपच्या वाचाळ नेत्यांना चांगलेच फटकारले. ‘सीएए’वरून दिल्लीत सुरू असेल्या दंगलीचा उल्लेख न करता त्याला चिथावणी देणाऱ्या भाजप नेते अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा, कपिल मिश्रा या वाचाळ नेत्यांना हा सल्ला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या