भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची फेरनिवड

377

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष म्हणून भाजपने आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी या दोन नियुक्त्यांची घोषणा केली.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक निकडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदींची नावे चर्चेत होती. मात्र अखेर पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याआधी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मुंबईच्या अध्यपदासाठी आशीष शेलार, खासदार मनोज कोटक यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपने आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. चंद्रकांत पाटील रविवारी भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या