कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानला जा, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही अशा लोकांनी पाकिस्तानात जावे असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार संगीत शोम यांनी केले आहे.

मंगळवारी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भारतीय युवा जनता युवा मोर्चाकडूने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा भाजप आमदार संगीत शोम म्हणाले की, आता कोरोनावरील लस आली आहे. तरी अनेक लोकांचा या लसीला विरोध आहे.” त्यांची मानसिकता पाकिस्तानी असून त्यांनी पाकिस्तानला निघून जावे असे शोम म्हणाले आहेत.

शोम म्हणाले की, “हे भाजपचे सरकार आहे कुणालाही घाबरण्याची गरज नाही, गुंडांना तुरुंगात पाठवले आहे किंवा ते राज्य सोडून पळून गेले आहेत. मायावती आणि अखिलेश यादव यांच्या काळात पोलीस आणि गुंडांची अभद्र युती झाली होती. या सरकारमध्ये अशा गोष्टींना थारा नाही. गुंड जेव्हा गोळी चालवतात तेव्हा पोलीस प्रत्युत्तर देतात.  तसेच जे लोक एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते छोट्या विचारांचे आहेत असेही शोम म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या