
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी जनता दरबार सुरू असताना हल्ला झाला. हल्लेखोराने रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार उघड होताच भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये कलगितुरा सुरू झाला. मोती नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश खुराना यांनी रेखा गुप्ता यांच्या हल्लेखोराचा आप नगरसेवकासोबतचा फोटो शेअर केला आणि हल्लेखोर ‘आप’शी संबंधित असल्याचा दावा केला. मात्र ‘आप’ने हा दावा खोडून टाकत सदर फोटो ‘एआय’द्वारे बनवण्यात आल्याचे स्पष्ट केले आणि खरा फोटो शेअर करत भाजपचे पितळ उघडे पाडले.
रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा गुजरातचा असून त्याचे नाव राजेश खिमजीभाई साकरिया (वय 41) आहे. त्याचा फोटो समोर आल्यानंतर भाजप आमदार हरीश खुराना यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी आरोपीचा थेट आपशी संबंध जोडला.
‘ज्याचा संशय होता तेच घडले आहे. अरविंद केजरीवाल यांचा खास माणूस गोपाल इटालिया यांच्यासोबतचा फोटो सर्व काही सांगून जातो. याचाच अर्थ आज रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा थेट संबंध आपशी असल्याचे स्पष्ट होते. या फोटोचे सत्य केजरीवाल यांनी सांगावे? हे नाते नक्की काय सांगते, हे स्पष्ट करा’, असे ट्विट हरीश खुराना यांनी केले.
जिसका शक था वही हुआ । @ArvindKejriwal के खास @Gopal_Italia के साथ फोटो बहुत कुछ कह रही है।
यानी आज हुए @gupta_rekha जी के ऊपर हुए हमले का कनेक्शन @AamAadmiParty से जुड़ता है ऐसा साफ़ नज़र आ रहा है।इस फ़ोटो की सच्चाई केजरीवाल जी बताए?
केजरीवाल जी प्लीज़ एक्सप्लेन “यह रिश्ता… pic.twitter.com/eOvkkVs92y
— Harish Khurana (@HarishKhuranna) August 20, 2025
हरीश खुराना यांनी शेअर केलेला फोटो एआय असल्याचे आपने स्पष्ट केले. आप नेते गोपाल इटालिया यांनी खुराना यांचे ट्विट रिट्विट करत एक फेसबुक लिंकही शेअर केली. माझ्या या जुन्या व्हिडीओतील काही स्क्रिनशॉट घेऊन ते एडिट करून खोटा फोटो बनवण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असूनही तुम्हाला असे घाणेरडे काम करताना जरा सुद्धा लाज वाटत नाही का? असा सवाल इटालिया यांनी खुराना यांना केला.
हरीश खुराना जी, आप की ख़ुद की तो किसी ट्रोलर से ज़्यादा इज्जत है नहीं लेकिन ऐसी घटिया हरकत करने से पहले अपने पिताजी मदनलाल जी की इज्जत की तो परवाह कर लेते?
दो रूपिये Per ट्वीट के हिसाब से काम कर रहे भाजपाई छुटभैये से भी निम्न स्तर के आप के कारनामे देखकर स्वर्गीय मदनलाल खुराना… https://t.co/KjeG09XACl
— Gopal Italia (@Gopal_Italia) August 20, 2025