भाजपसाठी आमदार थोरवेंनी शिंदे गटाचा बळी दिला, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले

उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांच्यासाठी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदे गटाचा बळी दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिंदे गटाच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेण्यास थोरवे यांनी भाग पाडले आहे, असा आरोप शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केला आहे.

उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला एकही जागा न देता ठेंगा दाखवला अर्ज भरले. मात्र अर्ज मागे घेण्याच्या आहे. त्यानंतर शिंदे गटाने स्वतंत्र शेवटच्या दिवशी शिंदे गटाने सर्व अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेण्याच्या प्रकारामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. केवळ भाजप आमदार महेश बालदी यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदे गटाचा बळी दिला. अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सर्व उमेदवारांवर दबाव आणला असा घणाघात अतुल भगत यांनी केला आहे.

– प्रचारादरम्यान भाजप आमदार महेश बालदी आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख अतुल भगत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. महेश बालदी यांनी तर यापुढे निवडणुकीत मते मागायला येणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांना दारात उभे करू नका असा इशारा दिला होता.

– उरण नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप आमदार महेश बालदी यांनी शिंदे गटाला एकही जागा दिली नव्हती, त्यामुळे शिंदे गटाने भाजपविरोधात निवडणूक लढवली.

– या वादामुळे भाजप व शिंदे गटात तेढ वाढली होती. पालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचा महाविकास आघाडीने धुव्वा उडवला होता.

शिंदे गट हद्दपार

जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गट समोरासमोर येतील अशी चिन्हे असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी आमदार महेश बालदी यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. थोरवे यांनी उरणमधील शिंदे गटाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार अर्ज मागे घेतले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी दिली. मात्र उरणमधून शिंदे गट हद्दपार करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे हेच प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केला आहे.