
भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Video | Nawab Malik | लवकरच भाजपमध्ये मोठी गळती, अनेक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात : नवाब मलिक@nawabmalikncp #BJP #NCP #MLA pic.twitter.com/ZHMxs1mn1e
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर थेट विधानसभेतच याचे सूतोवाच केले होते. फक्त चार महिने थांबा, आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले अनेक जण राजीनामा देऊन परत आमच्याकडे येतात की नाही हेच बघा.
भाजपचा राजीनामा देऊन जे येतील त्यांना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे समर्थन मिळेल. त्यामुळे निवडून येण्यास त्यांना कोणतीच अडचण उरणार नाही अशी ऑफरही अजित पवार यांनी दिली होती. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.




























































