
मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
विधानसभा अधिवेशनासाठी 22 डिसेंबरपासून समीर मेघे हे सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतरही आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. यातूनही इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सगळ्याच आमदारांची चिंता काहीशी वाढली आहे.




























































