भाजपने उडवली विरोधकांची खिल्ली, पाहा हे मजेशीर व्हिडीओ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपने रविवारी दहा अॅनिमेटेड व्हिडीओ रिलीज केले असून त्या व्हिडीओतून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओतून भाजपने राहुल गांधींचे कमकुवत नेतृत्व, महागंठबंधनमध्ये पंतप्रधान बनण्याची इच्छा असलेले नेते, उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपाची युती, बालाकोट एअरस्ट्राईकचे पुरावे अशा मुद्द्यांवर विरोधकांची खिल्ली उडवली आहे.