डिसेंबरअखेर भाजपला अध्यक्ष मिळेल- अमित शहा

486
amit-shah

डिसेंबरमध्ये भाजप अध्यक्षपदसाठी निवडणूक होईल आणि पक्षाला नवीन अध्यक्ष मिळतील असा दावा भाजपध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. तसेच आमच्या पक्षात पडद्यामागून कोणी पक्ष चालवत नाही असेही अमित शाह म्हणाले.

इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत शहा म्हणाले की, “पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रिय गृहमंत्रिपद ही दोन्ही काम समान आहेत. भाजपचे काम आणि देशाची सेवा यात काहीच अंतर नाही. गृहमंत्री आणि अध्यक्षपद माझ्याकडे असल्यामुळे मी सुपरपॉवर ठरत नाही. डिसेंबरमध्ये पक्षात अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. आमच्या पक्षाचे संविधान आहे. त्यानुसार निवडणुक होते. जेव्हा पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल तेव्हा जी मला जबाबदारी मिळेल ती मला मान्य असेल.” काँग्रेस पक्षाप्रमाणे पडद्यामागून आमचे काम चालत नाही असेही शहा यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या