खोके सरकार आणि उरण मतदारसंघातील भाजप आमदाराच्या मनमानीला कंटाळून खालापूरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यातील चौक परिसरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाल्यामुळे उरण विधानसभा क्षेत्रात सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षात आलेल्या या नवीन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहर भोईर यांनी शिवबंधन बांधून स्वागत गेले आहे.
उरण विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदाराच्या मनमानी कारभारामुळे खालापूर तालुक्यामधील चौक परिसरातील आसरे येथील भाजपचे पदाधिकारी मयूर पिंगळे, नंदू दुर्गे, प्रमोद पिंगळे, रोशन तवले, चेतन मोरे, चेतन जाधव, करण दुर्गे आदी नाराज होते. त्यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा विभागप्रमुख गोरख रसाळ आणि माजी उपसरपंच हरेश दुर्गे यांच्या पुढाकाराखाली चौक येथे पार पडला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, प्रवक्ते संतोष खांडेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उत्तम भोईर, सुनील थोरवे, राजेश पाटील, एम. के. गडगे, गोरख रसाळ, अनिकेत निकम, तेजस पाटील, प्रकाश जाधव, निखिल मालुसरे, बळीराम जांभळे, निखिल पाटील, मनोहर देशमुख, हरेश दुर्गे, दत्ता शिंदे, कृष्णा पाटील, बाळाराम ठोंबरे, भारती लोते, कृपाली मालकर, स्वाती जाधव, प्रशांत दुर्गे, अशोक पिंगळे, मनीष साबळे, संदेश दुर्गे आदी उपस्थित होते.