भाजपसाठी पल्लवी जोशी ‘डमी’ राफेल डील करते तेव्हा…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘जीएसटी- टॅक्स मेड सिम्पल’ व्हिडीओ काढून मोदी सरकारच्या निर्णयाची भलामण करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिने भाजपसाठी आता ‘डमी’ राफेल डीलही केले असून ही ‘डील’ फायदेशीर असल्याचे पटवण्याचा प्रयत्न केला आहे. पल्लवी व्हिडीओतून सांगते, ‘माझ्या हाऊसिंग सोसायटीच्या आधीच्या सचिवाने आमच्या सोसायटीसाठी ‘फ्लेन जेन लॉक सिस्टम’ खरेदी करण्यासाठी एका फ्रेंच कंपनीशी बोलणी करण्यात 10 वर्षे घालवली. त्या लॉकसोबत लागणाऱ्या आवश्यक त्या वस्तू मिळणार नसतील आणि मेण्टेनन्स, अपग्रेडस्चे वचन मिळणार नसेल तर त्याचा उपयोग? मग मी सरळ त्या फ्रेंच कंपनीच्या ‘बॉस’लाच गाठले. नव्याने बोलणी करून नवे डील केले. त्यात इतर लाभांसहित काही लॉकचे उत्पादन आपल्या देशातच तयार करण्याचे वचनही मला मिळाले. माझे हे ‘डील’ हाऊसिंग सोसायटीच्या आधीच्या सचिवाच्या डीलपेक्षा स्वस्त आणि मस्त ठरले. यालाच म्हणतात : राफेल डील!