अजित पवारांच्या गटाचा भाजपला चकवा, धारूरमध्ये गड राखला

धारूर नगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपाला विजयाने चकवा दिला. आमदार प्रकाश सोळंके यांनी धारूरचा गड राखला. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा ६६७ मतांनी विजय झाला.

धारूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. २० जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटाने ११ जागांवर विजय मिळवला. धारूरमध्ये भाजपाला केवळ सहा जागा जिंकता आल्या. तर शरद पवार गटानेही तीन जागा जिंकल्या. धारूर हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला विजयाने चकवा दिला. घडयाळ्याचे बाळासाहेब रामराव जाधव हे ६६७ मतांनी विजयी झाले. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने धारूर नगरपालिकेवर आपले वर्चस्व निर्माण केले. या निवडणुकीमध्ये प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांनी धारूरमध्ये विशेष लक्ष घातले होते. ही निवडणूक सोळंके यांनी प्रतिष्ठेची केली होती.