भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, रजनीकांत यांची ठाम भूमिका

1755
rajinikanth

दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार रजनिकांत यांनी 2017 मध्ये राजकारणात दमदार एन्ट्री केली. रजनी मक्कल मंद्रम या पक्षाची स्थापना केल्यानंतर आता ते राजकारणात सक्रीय झाले आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना रजनीकांत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) आपली प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न सुरू असून आपण त्यांच्या जाळ्यात अडकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. रजनीकांत यांनी केलेल्या हल्लाबोलमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

‘भाजप माझी प्रतिमा नव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहे. थोर संत कवी तिरुवल्लुवर यांच्या बाबतीत देखील त्यांनी तसा प्रयत्न केला होता. पण सत्य बदलणार नाही संत कवी तिरुवल्लुवर किंवा मी कुणीही त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही’, असे रजनीकांत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

याआधी हिंदी भाषेवरून देखील भाजप विरुद्ध रजनीकांत यांनी कठोर भूमिका घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या