पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 40 जणांची भाजपमधून हकालपट्टी, पाहा यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 40 जणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. उत्तराखंडमधील हे 40 सदस्य आहेत. उत्तराखंडमध्ये सध्या पंचायत निवडणुका सुरू आहेत. याच निवडणुकीमध्ये काही सदस्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर उत्तराखंड भाजपने या सदस्यांची हकालपट्टी केली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या सदस्यांची यादी प्रसिद्ध केला आहे. या यादीमध्ये नैनीताल, पिथौरागढ, बागेश्वरसह टिहरी येथील सदस्यांचा सर्वाधिक समावेश आहे. यात युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, जिल्हा मीडिया प्रभारी यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.