भाजपतील वाद चव्हाट्यावर, कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत दोन ज्येष्ठ कार्यकर्ते भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये भाजपातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर व स्थायी समितीचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्यामध्ये तु तु-मै मै झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेरीस ज्येष्ठांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला.

नगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयामध्ये भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चारही मंडलातील भाजप कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आले होते. मात्र, अवघे शंभर कार्यकर्ते या प्रशिक्षण शिबिराला हजर राहिले होते.

ज्येष्ठ नेते प्रा. मधुसूदन मुळे बोलत असताना कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देणार आहात की नाही अशी विचारणा ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर यांनी केली. पक्षाचे काय काम केले असा जाबही त्यांनी विचारला. आम्ही काय काय केले हे आम्हाला सांगायचे आहे, असे ते म्हणाले. त्यावरून एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी संध्याकाळी दिली जाईल, असे सांगताना माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी व्यासपीठावर आले. त्यांनी तुमचा पक्षाशी काहीही संबंध नाही. तुम्ही फक्त ज्येष्ठ म्हणून मिरवता असे म्हटले. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. त्यामुळे हे शिबिर तात्पुरते थांबविण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांच्यासह काही पदाधिकाऱयांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

जीएसटीचा परतावा राज्याला देणे बाकी ही वस्तुस्थिती – आमदार फरांदे

– जीएसटीचा परतावा राज्य सरकारला देणे बाकी आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, केंद्राचीही अवस्था फारशी चांगली नाही. तिथेही आर्थिक तूट आहे. राज्य सरकारला त्यांचे पैसे कधी ना कधी मिळणारच आहेत, असे प्रतिपादन भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

आम्हाला बोलण्याची संधी द्यावी असे मी म्हणालो होतो. आम्ही केलेले काम आम्हाला सांगायचे होते. मात्र, नरेंद्र कुलकर्णी यांनी दमदाटी केली. अंगावर धावून आले.

– मुकुंद देवगावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते.