बीकेसी-चुनाभट्टी पुलावर रिक्षा, बाईक्सना बंदी; प्रवाशांचा संताप

979

पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे कुर्ला संकुलाला जोडणारा व शीव ते धारावी हे अंतर 30 मिनिटांनी कमी करणारा ‘बीकेसी’ कनेक्टर हा उड्डाणपूल रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या या मार्गाकरून फक्त हलकी वाहने सोडण्यात येत आहेत. मात्र, यावरून रिक्षा आणि बाईक्सना देण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

बीकेसी चुनाभट्टी उड्डाणपूल होण्यापूर्वी बीकेसीतून जाणाऱ्या अन्य मार्गांवर ट्रॅफिकच्या समस्येने प्रवाशांना हैराण केलं होतं. आता हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर ट्रॅफिक कमी होईल, असा अंदाज होता. मात्र, उड्डाणपुलावर रिक्षा, बाईक्स आणि ट्रक यांना परवानगी नसल्याने सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि सीएसएमटी मार्गावर ट्रॅफिक जाम झाला होता. या उड्डाणपुलाची नोंदणी गुगल मॅपमध्ये झालेली नसल्याने अॅप्लिकेशन कॅब सर्व्हिसच्या टॅक्सींनाही जुन्याच मार्गावरून जावं लागलं. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये भर पडली.

काही बाईक चालकांनी या नियमाचं उल्लंघन करायचा प्रयत्न केला. मात्र ते जास्त गंभीर असल्याचं निदर्शनाला आलं आहे. उड्डाणपुलावर बाईक्सना बंदी असूनही काही बाईकस्वारांनी तिथून प्रवास करायचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅफिक पोलिसांना पाहून त्यातील काहींना यू टर्न घेऊन पळून जाण्याचाही प्रयत्न केला. उड्डाणपुलावर वाहने वेगाने ये-जा करतात, तेव्हा अशा प्रकारे यू टर्न घेणं म्हणजे भीषण अपघाताला निमंत्रण असल्याचंही प्रवाशांकडून बोललं जात आहे. त्यापेक्षा बाईक्सना आणि रिक्षांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या